खिर्डी येथील पत्रकार बांधवांनी कबुतराला दिले जीवदान
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा.
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान परिसरात आज सकाळी ९.३० वा.मि च्या सुमारास पतंगाच्या दोऱ्यामध्ये अडकून खाली पडलेल्या कबुतर (होलगा) हा पक्षी जख्मी अवस्थेत सादिक पिंजारी व भिमराव कोचुरे यांना दिसले.
या वेळी तेथे काही कुत्री त्यावर भुंकताना त्यांना दिसले, यामुळे कबुतर घाबरून गेल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच त्या पक्षाकडे धाव घेत त्याला पतंगाच्या दोऱ्यातून सुखरूप बाहेर काढून त्याला तात्काळ खिर्डी बु.येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेवून वेळीच कबुतर पक्षावर प्रथमोपचार करून त्याला मोकळ्या मैदानात स्वतंत्र करून दिले कबुतर पक्षावर वर्णोपचार तज्ञ सुपडू तायडे यांनी प्रथमोपचार केले.त्या ठिकाणी सादिक पिंजारी, प्रदीपराज पंजाबी, भिमराव कोचुरे, प्रविण शेलोडे आदी उपस्थित होते.