खिर्डी खु येथील अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य ग्रा.पं प्रशासनाचे दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात सन 2012 ते 2013 या वित्तीय वर्षात अंगणवाडी चे बांधकाम करण्यात आले असून या पूर्वी या भागात नेहमी साफ सफाई करण्यात येत होती परंतु गेल्या काही महिन्यांपासून पासून या भागात साफ सफाई अभावी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे.
तसेच या ठिकाणी पालापाचोळा पडला असून अंगणवाडीतील पाण्याचा नळ लिकेज झालेला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने पालापाचोळा कुजल्याने व गटारितील घाणी मुळे दुर्गंधी पसरली असून या ठिकाणी डासांची उत्पती होण्यास पोषक वातावरण निर्मिती असल्याने डासांच्या चाव्यामुळे अनेक विषाणूजन्य आजारांना बळी पडावे लागेल तसेच गवतावरील किडे चावल्यास त्वचेचे आजार होण्याची चिन्हे दिसत आहे.
यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असून या कडे ग्राम पंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देवून लिकेज बंद करून पाण्याची गळती थांबवावी तसेच परिसराची साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी पालकांसह सुज्ञ नागरिक करीत आहे.