खिर्डी येथील बुरुज तथा गाव दरवाजा मोजतोय शेवटची घटका
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डी खु या गावाची ओळख असलेला शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचा पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारा ऎतीहासिक बुरुज व गाव दरवाजा सध्या देखभाल दुरुस्ती अभावी अखेरची घटका मोजत आहे.
सदरील बुरुज तथा गाव दरवाजा हा गावाच्या मध्यभागी असून या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची वर्दळ सुरू असते.तसेच गाव दरवाजाच्या छत कमकुवत झाले असून माती आणि विटा खाली पडत असतात या मुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.तसेच मंगळवार च्या दिवशी या भागात आठवडे बाजार भरला जात असल्याने काही व्यापारी या ठिकाणी आपली दुकाने थाटत असल्याने सुध्दा त्यांच्यासह ग्राहकांच्या जीवालाही धोका असून या कडे ग्राम पंचायत प्रशासनाने वेळीच काळजी पूर्वक लक्ष देवून बुरुज आणि गाव दरवाज्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रतिक्रिया
गाव दरवाजा व बुरुज हे अत्यंत जीर्ण झाले असून सध्या पडक्या अवस्थेत असल्याने याबाबत संबंधित विभागाची रितसर परवानगी घेतल्यानंतर त्वरित दुरुस्ती करण्यात येईल.
डॉ.राहुल फालक
सरपंच खिर्डी खु.