भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

न्यूज पेपरचा वापर खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करू नये, अन्न व औषधी प्रशासनाचे सक्त आदेश

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ५ऑगस्ट २०२१ पासून लागू करण्यात आला असून सदर कायद्याचा उद्देश्य जनतेस सुरक्षित,सकस, व निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे हा आहे.

अनेकदा लोकांमार्फत बाहेरून खाद्य पदार्थ (नाश्ता) मागविला जातो.त्यावेळी खाद्य पदार्थ विक्रेते हे वडापाव,पोहे, यां सारखे खाद्यपदार्थ न्यूजपेपर मध्ये बांधून देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासून बनवलेली असते. डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटेल)या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाई साठी करतात. अशा न्यूजपेपर मध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करणे व ग्राहकांना देणे धोकेदायक ठरत असल्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी दि.६ डिसेंबर २०१६रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.तरी सर्व अन्न व्यावसायिक छोटे,मोठे हॉटेल्स,बेकरी व्यावसायिक,स्नॅक्स सेंटर, स्वीट मार्ट,वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सूचित करण्यात येते की,न्यूजपेपर मध्ये अन्न पदार्थाचे पॅकिंग त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा आपणाविरुध्द अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमन2011 अंतर्गत योग्य ती कडक् कारवाई करण्यात येईल असे आव्हान शि.स.देसाई अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त पुणे विभाग यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!