खिर्डी परिसरात खुलेआम अवैध गुटखा विक्री, प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी,ता.रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यात गुटखाबंदी असताना सुद्धा खिर्डी परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असून गुटखा विक्रीचा किरकोळ व्यवसाय करणारे पानटपरी चालक आज मोठे होलसेलर गुटखा विक्रेते झाले आहे.त्यांच्याकडे एफडीए विभागासहित संबंधितांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी करण्यात आली मात्र काही दिवसांसाठी राहिली परंतु पुन्हा या क्षेत्रात साखळी तयार होवून आज अगदी खेड्यापाड्यात राजरोसपने लहान टपरी व मोठ्या पानटपऱ्यांवर,तसेच किराणा दुकानांवरही सहजपणे गुटखा उपलब्ध होत असतो. खिर्डी परिसरातील अनेक गावांत लहान व मोठ्या पॅकिंग मध्ये गुटखा खुलेआम विकला जात असून
हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. मोटार सायकल व सायकल द्वारे खिर्डी व परिसरात दुकाने पाण-टपरी घरपोच गुटख्याची तस्करी होत आहे.
शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची लहान लहान मुलं शिकार होत असून व्यसनाच्या आहारी जात आहेत व कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण देत आहेत प्रशासनाने नवीन पिढीला व्यसनापासून दूर ठेवायचे असेल तर प्रशासनाने वेळीच गुटखा तस्करांना लगाम घालावा, गजबजल्या परिसरात ,बस स्टँड परिसर ,मराठी शाळा परिसर ,खिर्डीतील व परिसरातील सर्व पान-टपऱ्या वर राजरोसपने खुलेआम लायसन असल्या सारखे गुटका विक्री होत आहे खिर्डी हा अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू बनतो की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे , संबंधित प्रशासनाचा धाक नसल्यामुळे अवैध गुटखा विक्रीला कोण खतपाणी घालते ? रात्री-बेरात्री गुटखा खिर्डी व परिसरात कुठून येतो? हे गुटखा तस्कर कोण? याचा प्रशासनाला विसर पडला की काय ? अवैध गुटखा विक्री थांबवण्यासाठी प्रशासनाला वेळीच पावले उचलण्याची गरज असून अवैध गुटखा तस्करांना कधी आळा बसणार याकडे खिर्डी व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.