भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

खिर्डी येथे अवैध देशी,गावठी दारूची खुलेआम विक्री

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : खिर्डी येथे बस स्टँड परिसरात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री केली जाते.या मध्ये कामगारवर्ग व नवयुवकांना दारूचे व्यसन लागल्यामुळे आजची ही युवा पिढी बरबाद होत आहे.तसेच देशी व गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून 25 ते 30 वयोगटातील महिला या विधवा झाल्या आहेत तर लहान मुले ही वडिलांच्या प्रेमाला मुकलेली आहेत.तसेच महिला वर्ग दिवसभर शेतात काबाड कष्ट करून आपल्या घरसंसाराला आर्थिक मदत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात.मात्र महिलांना मारहाण करून त्यांना मिळालेले मजुरीचे सर्व पैसे हे दारू पिण्यात जात असतात.मात्र परिस्थिती याउलट होते मूलबाळ उपाशी आणि तळीराम मात्र तुपाशी असे चित्र दिसत आहे.

तसेच काही मुलींना बाप दारुड्या असल्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असून त्या मुली सध्या आपल्या आई सोबत शेतात कामाला जातात किंवा केळीचे घड वाहण्यास जातात हे वास्तव चित्र खिर्डी येथे दिसत आहे. दारूचे व्यसन असल्याने मिळालेला सर्व पैसा दारू पिण्यात जातो.दारू विक्रिला ग्राहकी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक व्यक्‍तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. तसेच काही तळीराम दारू पिऊन सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालतात तर काही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या महिला,विद्यार्थी व वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.मात्र तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे.तसेच ग्रा.पं प्रशासन व दारूबंदी कमेटी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने गावातून अवैध देशी, गावठी दारू विक्री बंद होईल का?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!