निंभोरा उड्डाण पुलाजवळील पर्यायी रस्त्याची दुरवस्था.अपघाताला आमंत्रण ..!
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। तालुक्यातील निंभोरा बु.येथे काही महिन्यांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने आजूबाजूच्या गाव परिसरातील वाहन धारक या मार्गाचा वापर सर्वाधिक करीत असून या रस्त्यावरून केळीचे ट्रक,ट्रॅक्टर,डंपर,प्रवाशी वाहतुकीचे व इतर तत्सम साधनांची नेहमीच वर्दळ असल्याने संबंधित ठेकेदाराने खडी व माती मिश्रित मटेरियल पासून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार केला असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने पाऊस पडल्यावर पर्यायी रस्ता हा चिखलमय झाला असून त्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने मागील दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला असून चिखलामुळे व खड्यांमुळे नागरिकांना व्यवस्थित पायी चालणे सुध्दा अवघड होते.
तसेच सदर ठिकाणी मोटरसायकल स्लीप होवून नागरिकांना दुखापत होत असून दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. तसेच सामोरा समोर वाहन आल्यानंतर एकमेकांना साईड देतांना सुध्दा वाहन चिखलात रुतण्याचे प्रकार नेहमी घडत असतात तसेच कामाचा पूर्ण करण्याचा कालावधी हा 24 महिन्याचा असताना देखील कासवगतीने काम सुरू असून ठेकेदाराचा बेजबाबदार पणा दुर्दैवाने काही अपघात तर घडवून आणणार नाही ना. ?