रावेरसामाजिक

खिर्डी येथील शेत रस्त्यांची दयनीय अवस्था,शेतकरी त्रस्त लोकप्रतिनिधी सुस्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी-भामलवाडी शेतशिवारामध्ये रस्त्याने माणसांना चालण्यास व्यवस्थित पायवाट नसल्याने चिखलातून व पाण्यातून येजा करावी लागते.शेतात जाण्यासाठी एकमेव पर्यायी रस्ता असल्याने या ठिकाणाहून जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागतो. मात्र सध्या पावसाची अधून मधून रिमझिम सुरू असल्याने मोठे मोठे खड्डे पडल्याने रस्ता पूर्णतः जलमय झाला आहे.

या रस्त्यावरून जात असताना बैलगाडीची चाके चिखलात रुतत असल्याने अनेक वेळा बैलांना गंभीर स्वरूपाच्या इजा झालेल्या आहे.तसेच खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांना रासायनिक खतांच्या ५०किलो वजनी बॅगा व कपाशीचे गोणे डोक्यावर घेवून वाहतूक करावी लागते.अशी विदारक परिस्थिती असूनही या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे आजपर्यंत लक्ष गेले नाही का? बऱ्याच वर्षांपासून रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या परिसरातील शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.हे रस्ते पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत यंदा झालेल्या पावसाळ्यात पाणंद रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्त करण्यात यावा.अशी मागणी या परिसरातील शेतकरी युवराज इंगळे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!