पूनखेडा येथील भोकर नदीवरील पुलाची दुरवस्था…
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। रावेर येथून ५किमी अंतरावर असलेल्या पूनखेडा ते रावेर या दरम्यान असलेल्या भोकर नदी वर सुमारे ३०ते ४०वर्षापूर्वी पुल बांधण्यात आला होता.नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे त्या ठिकाणचा भराव वाहून गेल्याने पुल झुकला असून सदर पुलावरून मोटर सायकल, फोर व्हीलर गाड्या यांची नेहमीच वर्दळ असते तसेच नदीपात्रातून तात्पुरत्या स्वरूपाचा पर्यायी रस्ता तयार केलेला असून त्या ठिकाणाहून बस, ट्रॅक, ट्रॅक्टर, इत्यादी तत्सम वाहनांना रस्ता पार करत असतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने अचानक पणे पाऊस पडल्यास नदीला पूर आल्यास एकमेव रस्ता असल्याने आठ ते दहा गावांचा संपर्क तुटू शकतो याची शास्वती नाही.तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा या पुलामुळे फटका बसू शकतो.मिळालेल्या माहितीनुसार पुलाचे काम मंजूर असूनही काम होत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.