खिर्डी खु येथील जिल्हा परिषद शाळेची सुरक्षा रामभरोसे, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील जिल्हा परीषद अंतर्गत येत असलेली मराठी मुलांची प्राथमिक शाळा हजेरी पटावरील मुलांची संख्या घटल्याने काही वर्षापासून बंद अवस्थेत पडली आहे.तसेच शाळेच्या आवारात मध्यान्ह भोजन योजनेची खोली बांधण्यात आली होती.परंतु सदरील खोलीची नासधूस करून आजमितीला एक साईड अर्धवट अवस्थेत लटकलेला चद्दर चा पत्रा दिसत आहे.पाण्याच्या टाकीची अवस्था अत्यंत बिकट आहे.
तसेच या ठिकाणी असलेले शौचालय व मुतारीची पडझड झाली असून भिंत उभी आहे.तसेच वर्ग खोलीवरचे कौलारू छप्पर असल्याने काही ठिकाणचे कौले अज्ञात लोकांनी फोडलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर काही वर्ग खोल्यांचे दरवाजे हे दिवस रात्र उघडे असल्याचे दिसत आहे.तसेच शाळेच्या आवारात गेट असूनही बंद करण्यात आले नाही समोरील भागात कुंपण नसल्याने शाळेच्या आवारात नेहमी क्रिकेट खेळनाऱ्या मुलांची गर्दी असते.ग्राम पंचायत प्रशासनाने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रूपये खर्च करून शाळेला जाळीचे कुंपण करण्यात आले परंतु काही अज्ञात लोकांनी जाळीचे कुंपण तोडले असल्याने जीर्ण व पडक्या अवस्थेत असलेल्या शाळेच्या वर्गखोल्यांच्या जवळून ग्रामस्थ नेहमी ये जा करतात.या ठिकाणी काही वाईट घटना घडल्यास यास जबाबदार कोण राहील असा प्रश्न निर्माण होत आहे.शालेय व्यवस्थापन समिती व ग्रा.पंचायत प्रशासन कार्यरत असूनही या गंभीर स्वरूपाच्या बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष का केले जात आहे.असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित उपाय योजना कराव्यात अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिक करीत आहे.