नेहरु युवा केंद्र व नेचर हार्ट फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत युवा जागरूकता कार्यशाळा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व नेचर हार्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पंचायत समिती रावेर यांच्या अनमोल सहकार्यातून आत्मनिर्भर भारत युवा जागरूकता अभियान कार्यक्रम पंचायत समिती रावेर सभागृहात पं.स.सदस्य दिपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.कार्यक्रमात 80 युवकांनी सहभाग घेतला असून कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल म्हणाले की, सकारात्मक विचारातुन युवकांनी पुढे युवून राष्ट्र बलशाली करण्यासाठी पुर्ण क्षमतेने कार्य करावे व आपले कर्तव्याचे पालन करावे. प्रा. डाॅ.जी.आर.ढेंबरे म्हणाले की, “देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवकांनी शासकिय विविध योजनांचा लाभ घेऊन स्वत:मधील कौशल्य विकसीत करावे. युवकांनी रोजगार मांगणारे न बनता, रोजगार निर्माते बनने गरजेचे आहे.” प्रा. सत्यशिल धनले म्हणाले की, आत्मनिर्भर भारत होणे ही काळाची गरज आहे. व देशाला आत्मनिर्भर करण्यात युवकांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. उमेशजी गाढे म्हणाले की महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योगाकडे लक्ष केंद्रित करावे.
सदरील कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन व्ही.एस. नाईक महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. जी.आर.ढेंबरे, प्रा.सत्यशिल धनले, सामाजिक कार्यकर्ते उमेश गाढे हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही. एस. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल, व संजय गांधी निराधार समिती सदस्य राजीव सवर्णे, तहसिल कार्यालय अ.का. दिपक गवई, प्रविण पाटील, पत्रकार संतोष कासोदे, ईश्वर जी महाजन,सरपंच ग्रा.प. निंभोरा सचिन महाले, सा. कार्यकर्ते हरीलाल कोळी, संदिप सावळे नेचर हार्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. शिवदास डी. कोचुरे आदी उपस्थित होते. सदरिल कार्यक्रमाचे कामकाज नेहरु युवा केंद्राच्या वतीने नेहरु युवा केंद्र जळगाव चे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक आनंदा वाघोदे व मुस्कान फेगडे यांनी पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेचर हार्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. शिवदास डी.कोचुरे यांनी तर सुत्रसंचालन अंकिता शिरनामे हीने केले.तर आभार विनायक जहुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेचर हार्ट फाऊंडेशनचे संचालक प्रशांत गाढे, सचिन वाघोदे, निलेश वाघोदे, रोहित सोनवणे, विनायक वाघोदे, आनंद जाधव, चंद्रकांत जहुरे, सुरेश वाघोदे, प्रशिक वाघोदे, दिपक कोचुरे, जय वाघोदे, अनिकेत सुरवाडे, रोहित वाघोदे, अजय तायडे, गोविंदा वाघोदे, गणेश कोळी, साहिल वाघ, रोशन भालेराव, निरज तायडे, कुणाल आदिवाल, शुभम जाधव यांनी परिश्रम घेतले.