खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान तर्फे पत्रकार दिवस साजरा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण संस्थांनतर्फे पत्रकार दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ६ जानेवारी पत्रकार दिवसाचे औचित्य साधून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सूजितजी कपाटे, निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उन्नवणे ,रावेर पंचायत समितीच्या सभापती कविता हरीलाल कोळी खिर्डी खुर्द उपसरपंच पुष्पाताई पाटील,तसेच श्री कृष्ण मंदिर संस्थानचे गादीपती आचार्य नरेंद्र महाराज उर्फ मोठेबाबा व जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन , तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी ,पत्रकार राजीव बोरसे यांसह मान्यवर उस्थितीत होते, यावेळी तालुक्यातील असलेल्या पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुजितजी कपाटे यांनी पत्रकारिता ही देश सेवा च असल्याचे म्हणत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यांसह मान्यवरांनी आपले मत मांडले .आयोजक प्रदीप महाराज पंजाबी यांनी प्रास्ताविक मांडले सूत्रसंचालन कुरकुरे यांनी केले तर आभार प्रा.दिलीप सोनवणे यांनी व्यक्त केले.