खिर्डी खु येथे डास प्रतिबंधात्मक औषधाची फॉर्गींग मशिनद्वारे धूर फवारणी..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। वातावरणातील बदलामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे खिर्डी येथे डेंग्यू, मलेरिया या आजारांचे रुग्ण संख्या नगण्य आहे. गावातील सुज्ञ नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतला धूर फवारणी करण्याची मागणी केली होती. खिर्डी खु. येथील सरपंच राहुल फालक यांनी त्वरित दखल घेत गावभर फॉर्गिग मशीनच्या माध्यमातून धुरळणी केली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यावर सुध्दा पाऊस बेपत्ता आहे. उष्ण व दमट हवामानामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर दाट लोकवस्तीत डास मोठ्या प्रमाणात आढळतात.तसेच डासांच्या नियंत्रणाकरिता आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने पाउले उचलत फाॅगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येत आहे.तसेच धुरळणीमुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येते. अगदी सायंकाळी गावात धुरळणी सुरू आहे. यामुळे गावात डासांची उत्पत्ती कमी होऊन रोगराई कमी करण्याकरिता धुरळणीचा वेग जेवढा अधिक तेवढे लांब धुरळणी करिता मदत होते. नुसत्या औषधांच्या वासाने डास कमी होण्यास मदत शक्य आहे. आरोग्य विभागातून पुरविलेल्या औषधीचा वापर मशीनच्या माध्यमातून केला जातो. पेट्रोल व डिझेल यांचा वापर यात केला जातो. गल्लीबोळात धूळ उडवत डास नियंत्रित करण्याकरिता सरपंच राहुल फालक यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहे. धूर फवारणी करताना सरपंच राहुल फालक, आरोग्य सेवक, डॉ.चंदन पाटील, व ग्रा.पं कर्मचारी योगेश कोळंबे, कुंदन झोपे, जितू फालक, दुर्गादास हंसकर सादिक पिंजारी आदी उपस्थित होते.