अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक विभाग आयुक्त कांतीलाल उमप, साहेब आणि राज्य उत्पादन विभाग अधीक्षक श्रीमती.सीमा झावरे जळगांव यांच्या गावठी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेशानुसार जानेवारी महिन्यात भुसावळ,मुक्ताईनगर,बोदवड,यावल,व रावेर तालुक्यात केलेल्या धडक कारवाईत विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ यांच्या पथकाने अवैध दारू विक्री ढाबे, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्रे, हातभट्टी दारू वाहतूक तसेच बनावट मद्यनिर्मिती,विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकून एकूण १२,०२,९७७रू किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत ४२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
१) ३४२०० ली. रसायन.
२) ६५३ ली.गावठी हातभट्टी
दारू.
३) १६९.०२ ली.देशी दारू.
४) ७२.१६ ली.विदेशी मद्य.
५) ५५.४९ ली.बियर
६) १३१.४० ली.बनावट विदेशी मद्य.
७) १ओमनी कार
८) ३ मोटर सायकल
सदर कारवाई विभागीय निरीक्षक
सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ,
दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दु.निरीक्षक सत्यविजय ठेंगडे, यांनी यशस्वी रित्या कारवाई केली.गुन्ह्यांचा पुढील तपास रा.उ.शुल्क भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक.राजेश सोनार, व दु.निरीक्षक सत्यविजय ठेंगडे हे करीत आहे.