भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध गावठी दारू निर्मिती व अवैध मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांवर छापे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,भीमराव कोचुरे । राज्य उत्पादन शुल्क विभागा भुसावळ यांच्या अखत्यारीत येणाऱ्या रावेर आणि भुसावळ तालुक्यात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप,,विभागीय अधिक्षक श्री.सीमा झावरे मॅडम यांच्या आदेशानुसार भुसावळ येथील विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकास सावतर निंभोरा, हातनूर ता.भुसावळ व निंभोरासिम ता.रावेर जि.जळगांव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू निर्मिती व ढाब्यांवर अवैध रित्या मद्यविक्री होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त बातमी नुसार आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील सावतर निंभोरा, हतनूर ता.भुसावळ व रावेर तालुक्यातील निंभोरासिंम या ठिकाणी छापे टाकून ८८००लि. कच्चे रसायन व११८लि.गावठी दारू,गावठी दारू निर्मिती साठी लागणारे इतर साहित्य तसेच अवैध मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यांवर ६२.८२लि.देशी मद्य,२४.१२लि.विदेशी मद्य,तसेच २३.४०लि.बियर व एक मोटर सायकल,हे सर्व मिळून २,७७,७६० रू.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, सत्यविजय ठेंगडे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यावल तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवान तथा वाहन चालक सागर देशमुख, सहा.दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ,जवान विठ्ठल हाटकर,यांनी यशस्वी रित्या कारवाई केली.असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास रा.उ.शुल्क विभागीय निरीक्षक सुजित कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश सोनार हे करीत आहे.

प्रतिक्रिया-
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर तालुक्यात या पुढेही अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री तसेच अवैध मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांविरोधात कारवाया सुरूच राहतील.
सुजित कपाटे
विभागीय निरीक्षक
म.रा.उ.शुल्क विभाग कार्यालय भुसावळ.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!