ग्रा.रो.सेवकांच्या मागण्यांसंदर्भात पं स.सदस्य दिपक पाटील याचे रो.ह.मंत्री संजय बनसोडे ना निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। 2 आक्टोबर रोजी रावेर तालुक्यातील महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामरोजगार सेवक संघटना रावेर तालुक्याच्या वतीने एकदिवशी लाक्षणीक उपोषणासाठी ग्रामरोजगार सेवक पदाधिकारी जि.सदस्य युवराज चौधरी ता.अध्यक्ष सुभाष सपकाळे,उप अध्यक लतीब तडवी व सचिव उमेश गोविंदा तायडे व असे रावेर तालुक्यातील पन्नास ग्रामरोजगार सेवक उपोषणाला बसले होते.
त्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य दिपकभाऊ पाटील व त्यांच्या सहकार्यानी भेट देऊन ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व आश्वासन दिले ग्रामपंचायत मध्ये शासकीय सेवेत समाविष्ट करणे ही मागणी रास्त आहे.असे त्यांनी सांगितले होते आणि आज 6 आक्टोबरला त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजीत पवार याना निवेदन दिले.व महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी राज्यमंत्री ना.संजय बनसोडे याची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जळगाव जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील,व राष्ट्रवादी युवक जिल्हाकार्यध्यक्ष तथा रावेर पंचायत समिती सदस्य दिपक पाटील,राष्ट्रवादी युवक जिल्हासमन्वय आबा पाटील,बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यध्यक्ष निलेश पाटील,सतीश पाटील आदी उपस्थित होते.