भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

केंद्र सरकारकडून ईडी चा होणारा गैरवापर थांबवा,सर्व घटक पक्षाचे निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे ,प्रतिनिधी। खिर्डी येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी केंद्रीय यंत्रणा ईडी चा केंद्र सरकार कडून सातत्याने गैरवापर होत असून महाराष्ट्रात महविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा हेतूने
राज्य मंत्र्यांवर खोटे आरोप करून केंद्रसरकर ची पोलखोल करणाऱ्या नेत्यांच्या निर्भिड आवाजाला दाबण्याचा प्रकार घडत असल्याने राज्यमंत्री नवाब मलिक यांना समन्स न देता अटक करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने आज निंभोरा पो.स्टे.चे स.पोनि गणेश धुमाळ यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी जाकिर पिंजारी,घनश्याम पाटील,विनोद पाटील, डॉ.राहुल फालक,कय्युम बेग,फरीद शेख,अकील बेग,सादिक पिंजारी कांतीलाल गाढे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!