भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी बु.येथे १ लाख १७ हजार रू.किंमतीची अवैध देशी दारू जप्त. उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दि.८-३-२०२२ रोजी रावेर तालुक्यातील खिर्डी येथे देशी दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकून देशी दारुची अवैधरित्या विक्री करतांना दोन इसम आढळून आले असता दोन्हीं आरोपीविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून त्या ठिकाणी देशी दारूचे १ लाख १७ हजार २२० रू.किमतीचे एकूण ४० बॉक्स हस्तगत करण्यात आले .

या बाबत अधिक माहिती अशी की,रा रावेर तालुक्यातील खिर्डी येथे अवैध देशी दारूची विक्री करीत असताना १)कुलदीप भागवत जैस्वाल, २) जितेंद्र रमेश जैस्वाल ,रा.खिर्डी ता.रावेर हे दोन आरोपी आढळून आले.यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी
अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.सदर ठिकाणी अवैध मद्य साठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता असल्याने या बाबत तपास सुरू असल्याचे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांनी ” मंडे टू मंडे न्युज ” प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.सदर कारवाई विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ, दुय्यम निरीक्षक.राजेश सोनार, दुय्यम निरीक्षक.सत्यविजय ठेंगडे.यावल, सहा.दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान विठ्ठल हाटकर,सागर देशमुख, नितीन पाटील यांनी यशस्वी रित्या केली असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक श्रीमती.सीमा झावरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!