निंभोरा पोलिसांनी वीज तारा चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या,४ लाख १४ हजार रू.किमतीचा मुद्देमाल जप्त.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। निंभोरा पोलीस स्टेशनचे पो.हे.का.विलास झांबरे हे ९-३-२०२२ रोजी नेहमी प्रमाणे पोलिस व्हॅन द्वारे रात्रीची गस्त दरम्यान फिरत असताना रात्री १२वा.३०मी.च्या सुमारास बलवाडी ते तांदलवाडी रोडवर असलेल्या सिंगत गावाच्या पुढे त्यांना टाटा कंपनीचा MH19 CY.7714 या नंबरची मालवाहू गाडी ही संशयास्पद स्थितीत रोडवर उभी दिसल्याने त्यांनी सदर गाडी चालकास विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांचा संशय अधिकच बळावल्याने त्यांनी याबाबत पो.स्टे.ला कळविले असता स.पोनि.गणेश धुमाळ व पोलिस नाईक. ईश्वर चव्हाण हे आपल्या स्टाफसहित रवाना झाले.सदरील गाडी मध्ये ६०हजार रू किमतीचे अल्युमिनियम तारांचे बंडल आढळून आले.
याबाबत अधिक चौकशी केली असता गाडी चालक जितेंद्र शांताराम पवार यांनी सांगितले की, बंटी संजय भिल,आकाश संजय पाटील,लखन प्रल्हाद पाटील,समाधान युवराज गुजर,दिनेश ईश्वर गुजर,सर्व रा. शिंदी ता.भुसावळ येथील असून अल्युमिनियम चे तार चोरी करण्यासाठी आले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.त्यांच्या ताब्यातील गाडी व तारांचे बंडल यांचेसह ४लाख १४ हजार रु किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून गुरनं ३३/२२ भादंवि ३७९ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच याबाबत स.पोनि.गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना.ईश्वर चव्हाण हे करीत आहे.