मटका जुगारासह अवैध देशी, विदेशी दारू विक्रेत्यांवर निंभोरा पोलिसांनी कारवाई
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। निंभोरा,बलवाडी, आंदलवाडी सह खिर्डी, ऐनपूर या गावी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली असून निंभोरा बु.येथे६९००रू.किमतीच्या देशी दारूच्या ९०बाटल्या व ५०ली.गावठी दारू, बलवाडी येथे २४००रू किमतीची ४०ली.गावठी दारू, व आंदलवाडी येथे २५०० रू किमतीची ५०ली गावठी दारू तसेच खिर्डी बु.येथे देशी विदेशी दारू,मोबाईल फोन व रोख ४६०८०रू मुद्देमालासह आरोपींना अटक केली असून त्यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं ७१/२१, ७२/२१, ७३/२१, ७६/२१ तसेच खिर्डी येथे मटका जुगारावर धाड टाकली असता त्या ठिकाणी मटका जुगाराचे साहित्यासह रोख २६०रू.जप्त करण्यात आले.
ऐनपूर येथे सुध्दा अवैध मटका जुगारावर कारवाई करत १२२०रू रोख रकमेसह आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम १२अ गु.र.नं ७४/२१ व ७५/२१ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ आरोपीस अटक करण्यात आली आहे तसेच एकूण ६० हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन येथे वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कारवाई सपोनि स्वप्नील उन्नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पो.का, रा.का.पाटील, हे.का विकास कोल्हे, पो.नाईक ईश्वर चव्हाण, पोलीस हे.का अब्बास तडवी, स. फौ.अन्वर तडवी, राकेश वराडे , सादिक शेख,पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, सदरची कारवाई यांनी केलेली आहे.तसेच निंभोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.परन्तु नियमित पने कारवाई होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.