खिर्डी खु.येथे नवीन पाइप लाईन चे खोदकाम करताना मुख्य जलवाहिनी फुटली
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। खिर्डी खु.येथील नवीन गावठाण भागात असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे ४ ते ५ वर्षा पूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४ इंच ४ kg चे सुप्रीम कंपनीचे पाइप लाईन टाकण्यात आली होती सदरील पाइप लाइन वारंवार फुटत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनास तिटकारा आल्याने त्या जागी जिल्हा परिषद मार्फत देखभाल दुरुस्ती अंतर्गत सुप्रीम कंपनीचे ४इंच ६kg ची नवीन पाइप लाइन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने खोदकाम करतेवेळी पाण्याच्या टाकीला पाणी पुरवठा करणारी पाइप लाइन गटारीच्या अगदी जवळच फुटली असून त्या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेले व ते रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना चालण्यास तसू भर जागा नसल्याने घान पाण्यातून येजा करावी लागत आहे.तसेच गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी खड्डयात साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकत असल्याने संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर लिकेज जोडण्यात यावे तसेच टीसीएल पावडर ने पाण्याची टाकी स्वच्छ करावी अशी मागणी ग्रामस्थांसह सुज्ञ नागरिकांनी केली आहे.