खिर्डी खुर्द येथील व्यापाऱ्यांकडून करोडोची फसवणूक,37 शेतकऱ्यांची निभोंरा पोलीसात तक्रार
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। खिर्डी खुर्द येथील पाच ते सहा व्यापाऱ्यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कपाशी ,केळी मका, ज्वारी ,गहु खरेदी करून घेतले मात्र अनेक शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे उघड झाले आहे यात काही शेतकरी राहीलेले पैसे मागण्यासाठी गेले असता खिर्डी च्या व्यापाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार निभोंरा पोलीसात करण्यात आली आहे यात एकुण 85 शेतकऱ्यांचे कोटी च्या आसपास व्यापाऱ्याकडे पैसे असुन या पैकी 37 शेतकऱ्यांनी खिर्डी येथील तंटामुक्त समीती मार्फत निभोरा पोलीस ठाण्यात पाच ते सहा व्यापाऱ्यांविरोधात तक्रार अर्ज सादर केले आहेत.
या शेतकऱ्यांकडे दिलेल्या मालाच्या पावत्या व बॅकेचे धनादेश आहे या पुर्वी देखील भुसावल येथील उदयोजीका सानीया कादरी यांनी तालुक्यातील ऐनपूर निबोल येथील शेतकऱ्यांची केळी घेतली होती त्यांच्या मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही व धनादेश बॅकेत वटत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी निभोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती हे प्रकरण न्यायप्रवीष्ठ असतांना पुन्हा खिर्डी येथील काही व्यापाऱ्यांनी अशाच पद्धतीची फसवणूक झाल्या बाबत तक्रार अर्ज दाखल केले आहेत सध्या तरी 37 शेतकऱ्यांनी अर्ज दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र 90 ते 95 शेतकरी आपले अर्ज सादर करणार असल्याचे समजते या बाबत 37 शेतकऱ्यांनी सुरवातीला खिर्डी बुद्रुक तंटामुक्त समीती चे अध्यक्ष चंद्रजीत पाटील सरपंच गफुर कोळी माजी पोलीस पाटील अरूण पाटील माजी पंचायत समीती उपसभापती घन:शाम पाटील ,किरण नेमाडे ,जयंत पाटील,गंभीर पाटिल यांच्या कडे फसवणूकी बाबत अर्ज सादर केले परिसरातील किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्याबाबत वेळावेळी तंटामुक्त समीतीने शेतकऱ्यांना आवाहन केले त्यात व्यापाऱ्यांकडे कोटयावधीचा आकडा समोर आला आहे यात शेतकरी व तंटामुक्त समीती यांनी निभोरा पोलीस ठाण्यात जावून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना अर्ज सादर केले शेतकऱ्यांसोबत पोलीसांनी बैठक घेवून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक करणारे व्यापारी — सुलेमान पिंजारी,इस्राईल पिंजारी,इस्माईल पिंजारी,जंहागीर पिंजारी,सुलतान शेख उर्फ नशीर.
खिर्डी येथील व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत व्यापाऱ्यांना बोलवून त्यांची चौकशी करण्यात येईल. स्वप्नील उनवणे.
सपोनि निभोरा पोलीस स्टेशन
85 शेतकऱ्यांचे कोटीच्या आसपास व्यापार्याकडे पैसे असून या पैकी 37 शेतकऱ्यांनी खिर्डी बु।। येथील तंटामुक्त समिति मार्फ़त पोलिस स्टेशन ला देण्यात आले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेवट पर्यंत लढा तंटामुक्त समिति तर्फे करण्यात येईल —– तंटामुक्ती समिती अध्यक्ष ॲड. चन्द्रजीत पाटिल खिर्डी बु.