खिर्डी खु.येथील सार्वजनिक शौचालयांची बिकट अवस्था.ग्रा.पं ने लक्ष देण्याची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर ,भिमराव कोचुरे ।
शासनामार्फत टीव्ही,बॅनर,वृत्तपत्रे इत्यादी माध्यमातून वारंवार जनतेला आवाहान करण्यात येते शौचालय बांधा आणी त्याचा वापर करा.परंतु या आवाहानाच्या विपरीत परिस्थिती खिर्डी खु येथे दिसत आहे.तसेच बाजार पेठ परिसर गट नंबर 3 या भागात पुरुष तसेच महिलांसाठी बांधलेल्या शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून आजूबाजुला मोठ्या प्रमाणात गवत व काटेरी झाडे झुडपे उगवलेली असून चोहोबाजुंनी मात्र घाणीचे साम्राज्य असल्याने दुर्गंधी पसरली आहे.तसेच लाईट व पाण्याची देखील सोय नसल्याने त्याची अधिकच बिकट अवस्था झाल्याचे वास्तविक चित्र दिसत आहे.
या ठिकाणी फक्त शासनाच्या पैशाची उधळपट्टी करून बांधण्यात आलेले शौचालय म्हणजे फक्त एक देखावा असल्याचे चित्र दिसत आहे.या भागातील पुरुष व महिला शौच विधी साठी उघड्यावर बसत असल्याने त्या परीसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवासी ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचातीने साफ सफाईची तसेच पाण्याची व लाईटची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.