खिर्डी ते निंभोरा रस्त्यावर घाणीचे साम्राज्य.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी खु.येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्टेशन रस्त्यावर असलेल्या विट भट्टया जवळ व एस.पी.राणे विद्यालय या ठिकाणी काही केळी व्यापारी दररोज केळीचे ट्रॅक, ट्रॅक्टर द्वारे माल भरत असून या ठिकाणी खराब व तुटलेली केळी, दंडे न उचलता तिथेच मोठ्या प्रमाणावर टाकले जात असतात.
तसेच सध्या अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे सदरील कचरा सडला असून या टाकलेल्या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.तसेच स्टेशन रस्त्याने दररोज सकाळ व संध्याकाळी लहान मुले,महिला व जेष्ठ पुरूष हे फिरण्यासाठी जात असतात त्यातच रस्त्याच्या बाजूला टाकलेली घाण ही आरोग्यास हानिकारक असून त्यातून निघणाऱ्या विषारी वायू मुळे होणाऱ्या प्रदूषणाची धग वाढत चालली आहे.तसेच त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आधीच पूर्ण देश कोरोनाच्या संकटातून सावरत असतांना, सध्या डेंग्यू सारख्या आजाराने तोंड वर काढले असतानांच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यावर ठोस उपाय योजना करीत नसल्याने कचऱ्याची दुर्गंधी येत असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मात्र अतिशय त्रास होत आहे. शेजारीच हाकेच्या अंतरावर गाव, शाळा असून त्यांना एखाद्या संसर्गजन्य आजारांना तोंड देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.यावर स्थानिक प्रशासनाने त्वरित काळजीपूर्वक लक्ष देवून त्या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी.तसेच पुन्हा त्या ठिकाणी घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
1) प्रतिक्रिया.
स्टेशन रोडच्या बाजूला असलेला घाण कचरा उचलण्या संदर्भात आपण केळी व्यापाऱ्यांना दोन तीन वेळेस तोंडी समजावून सांगितले असून त्यांनी अद्यापही कचरा उचलला नसल्याने त्यांना रितसर ग्राम पंचायत मार्फत नोटीस देण्यात येईल व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
राहुल फालक सरपंच खिर्डी खु.
2) प्रतिक्रिया..
स्टेशन रोड परिसराने भर रस्त्यात ट्रक,ट्रॅक्टर,गाडी लावून केळी व्यापारी माल भरतात.त्यांना कुणाचं अभय तर नाही ना?
तसेच ग्रा.पं.हद्दीत असल्याने त्यांना रीतसर नोटीस अथवा दंडात्मक कार्यवाही करणे उपेक्षित आहे.
त्याचबरोबर जवळचं रेल्वे उड्डाणं पुलाचे काम चालू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेहमी येत असतात.मग त्यांना भर रोडवर एवढी मोठी केळीचे घाण पडलेली असून साईड पट्या पूर्ण झाकल्या गेल्या असून.मधोमध केळी चे ट्रक उभे आहेत हे त्यांना दिसत नाही का? हे सगळं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे.
विनायक जहुरे-सामाजिक कार्यकर्ते