अजंदा येथील रस्त्याची दयनीय अवस्था. प्रशासनाचे दुर्लक्ष…
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी )। अजंदा रावेर रस्त्यावरील ब्रिटीश कालीन रेल्वे पुलाला पर्यायी नवा बोगदा उभारण्यात आला असून तेथील रस्त्याची अत्यंत वाईट दुर्दशा झाली असून हा रस्ता रावेर शहराला जाण्यायेण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरील ब्रिटीश कालीन रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत होते.
त्याला पर्याय म्हणून वर्षभरापूर्वी नवा बोगदा उभारण्यात आला होता.मात्र येथील रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडल्याने त्याची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. आजुबाजुच्या गावातील केळी व्यापारी शेतमजूर यासह प्रवाशी वाहनधारक या रस्त्याने निंबोल, ऐनपूर,खिर्डी,तांदलवाडी यासह अनेक गावांना जा ये करत असतात.त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरुच असते.परिणामी खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही समस्या कायम असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.