भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

खिर्डी खु.येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घाणीच्या साम्राज्यामुळे झाले डासांच्या उत्पत्तीचे पैदास केंद्र

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे,विशेष प्रतिनिधी। निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खिर्डी खु येथील आरोग्य उपकेंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात अस्व्छता असल्याने झाडे झुडपे वाढली असून येथील आरोग्य सेवक कार्यतत्पर असूनही आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात आजूबाजूला असलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे मात्र दुर्लक्ष का? होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तसेच या ठिकाणी निवासाची व्यवस्था असूनही कर्मचारी आरोग्य उपकेंद्रात राहत नसल्यामुळे येथील प्रसूती गृहाच्या खिडकीच्या काचा सुद्धा अज्ञातांनी फोडल्याचे दिसत आहे.या पूर्वी उपकेंद्राच्या निवासस्थानी आरोग्य सेविका वास्तव्य करीत होते मागील तीन ते चार वर्षापासून येथे कोणताही आरोग्य कर्मचारी अद्यापही वास्तव्याला नाही.तसेच यापूर्वी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती अभावी खूप दयनीय अवस्था झाली होती.एक वर्षापूर्वी रंगरंगोटी करून दुरुस्तीच्या नावाखाली लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून वरून किर्तन आतून तमाशा अशी गत खिर्डी खु येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची झाली आहे.तसेच या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी व प्रसुती केली जाते.गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हेच घाणीच्या साम्राज्याचे माहेर घर बनले आहे.तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात असलेली गटारीची साफ सफाई केल्यानंतर घाण उचलली जात नाही.तसेच वेळेवर गटारीची साफ सफाई होत नसल्यामुळे डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या ठिकाणी उपचारा करिता येणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागतो.या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग व ग्राम पंचायत प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसतेय.

आरोग्य उपकेंद्राला आजूबाजूला जाळीचे व तारांचे कुंपण केले आहे मात्र मुख्य रस्त्यावर गेट बसविण्यात आले नसल्याने कोई भी आव और कोई भी जाव घर तुम्हारा अशी परिस्थिती असून या परिसरात ज्या ठिकाणी गेट ची आवश्यकता नाही त्याठिकाणी गेट का ठेवण्यात आले अशा प्रश्न ग्रामस्थांना नेहमीच पडत असतो मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप अशी बघ्याची भूमिका का घेतली जाते.आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात घाण टाकणाऱ्या नागरिकांवर मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत असुन या सर्व प्रकाराला आरोग्य विभाग व ग्राम पंचायत प्रशासन खतपाणी घालत आहे की काय असेच चित्र सध्या दिसत आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या परिसराची त्वरित साफसफाई करण्यात यावी तसेच मुख्य रस्त्यावर गेट बसविण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!