भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु.येथील बाजारपेठ जवळील रस्ता चिखलमय सा.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…

Monday To Monday NewsNetwork

खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी) खिर्डी ते बलवाडी हा मुख्य रस्ता राष्ट्रीय महामार्ग ४६ला जोडला जात असून या रस्त्यावरून केळीचे ट्रक,ट्रॅक्टर,डंपर,प्रवाशी वाहतुकीचे साधनांची नेहमीच वर्दळ असल्याने पावसाळ्यात रस्त्यावरचे डांबर व खळी मोठ्या प्रमाणात वाहून गेली असल्याने त्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून चिखलामुळे व खड्यांमुळे नागरिकांना व्यवस्थित पायी चालणे सुध्दा अवघड होते.तसेच सदर ठिकाणी मोटरसायकल स्लीप होवून नागरिकांना दुखापत होत असून दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण असा बिकट प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सामोरा समोर वाहन आल्यानंतर एकमेकांना साईड देतांना वाहन चिखलात रुतण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बाजार पेठ पासून ते रजा नगर पर्यंत ४ते५ महिन्यापासून १००मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण मंजूर झाले असून अद्यापही कामाला सुरवात करण्यात आली नाही.काम सुरू न होण्याचे गौडबंगाल आहे तरी काय? लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे.

प्रतिक्रिया- भिमराव कोचुरे स्थानिक रहिवाशी खिर्डी खु. बाजार पटयापासून ते रजा नगर पर्यंत काम मंजूर असूनही ठेकेदार काम करत नसल्याने दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचत असून मोटर सायकली स्लीप होत असतात. संबंधित ठेकेदाराने पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम सुरू करावे अन्यथा काम सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया- इम्रान शेख मुख्य अभियंता PWD रावेर
संबंधित रस्त्याचे १०० मी.काँक्रीटीकरण मंजूर असूनही ठेकेदार काम करत नाही ठेकेदाराला तीन चार नोटीस दिलेल्या आहे.सोमवार पासून काम सुरू करण्याचे सांगितले असून सुध्दा अद्यापही काम सुरू करण्यात आले नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!