भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

कांडवेल येथे बिबट्याची दहशत, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क रहावे,वनविभागाने केले आव्हान

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे ,प्रतिनिधी। खिर्डी येथून जवळच असलेल्या कांडवेल येथे गेल्या तीन ते चार दिवसांपासून शेतशिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा सुरू होती अफवा समजून नागरिकांनी या गोष्टीला दुजोरा न देता.शेतीची दैनंदिन कामे सुरूच ठेवली.परंतु १२फेब्रुवारी ला मोहन शांताराम पाचपोळे यांच्या खळ्यात बिबट्याने दोन बकऱ्या फस्त केल्या असून एक बकरी मृतावस्थेत आढळून आली.

सदर घटना उघडकीस आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांनी सदर घटनेची माहिती दिली असता रावेर वनविभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर, वनपाल अतुल तायडे,व रवींद्र सोनवणे यांच्यासह त्वरित दाखल झाले असता त्यांनी पाऊलखुणा पाहिल्यानंतर बकऱ्या फस्त करणारा प्राणी हा बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर शेतशिवारात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून त्या संबंधी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.तसेच शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान वनविभागा तर्फे करण्यात आले आहे. लवकरच बिबट्याला पकडण्यात येईल असे वनपाल अतुल तायडे यांनी मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी शी बोलतांना माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!