भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसामाजिक

खिर्डी ते भामलवाडी रस्ता, “रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता” गटारींचे पाण्याची विल्हेवाट लावा, ४ गावांच्या सरपंचानी पाठपुरावा करावा, ग्रामस्थांची मागणी

गोलवाडा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. जीवन महाजन l खिर्डी ते भामलवाडी रस्ता हा जीवघेणा रस्ता बनला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून ” रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता” आहे हेच समजत नाही.या रस्त्याचे रूंदीकरण वाढवून गटारींचे पाण्याची विल्हेवाट करून एक बाजुची गटार कायम बंद करण्यात यावी. तसेच ४ गावांच्या सरपंचानी ग्रामपंचायतीचे ठराव देऊन पाठपुरावा करावा अशी मागणी परिसरातील पुरी-गोलवाडा, शिंगाडी- भामलवाडी, खिर्डी आदी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

अनेक दिवसांपासुन शासनाकडे व लोकप्रतिनिधी कडे सदर रस्त्याविषयी निवेदन देण्यात आलेली आहे परंतु आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही सदर रस्ता हा ४ गावांना जोडणारा रस्ता आहे. पुरी-गोलवाडा, शिंगाडी- भामलवाडी या गावांची वर्दळ नेहमी असते.

” रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता”
सद्यस्थितीत रस्याची ते अवस्था अत्यंत खराब झालेली आहे मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे.” रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे” हेच समजत नाही. यामुळे नागरीक त्रस्त आहे खिर्डीहुन येताना दोन्ही बाजुला गटारी आहे या गटारींची खोली खुप मोठी असल्याने नागरीकांध्ये भीतीचे वातावरण आहे या गटारींचे पाण्याची विल्हेवाट लावुन एक बाजुची गटार कायम बंद करून रस्त्याची रूंदी वाढायला पाहिजे जेणेकरून धोका राहणार नाही कारण पावसाळ्यात मोठे वाहन येताना दुचाकी वाहने गटारीत पडण्याची शक्यता असते अनेक वेळा याठिकाणी अपघात झालेले आहे.

आगाराची बस येताना समोरून येणा-या वाहनाला जायला जागा शिल्लकच राहत नाही मोठ्या प्रमाणात जीव धोक्यात टाकुन कसाबसा लोकांचा प्रवास नेहमी सुरू असतो शाळेतील विद्यार्थी ये-जा करताना पालकांना नेहमी काळजी असते ती म्हणजे माझी मुले घरी सुरक्षीतपणे येतील किंवा नाही दुचाकी वाहने जाताना या रस्त्यावर ओव्हरटेक करताना भीती वाटते.

या ४ गावांमध्ये ज्या वेळेस लग्न किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यु होतो त्यावेळेस या रस्त्यावरून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळेस नवीन प्रवाशांना प्रवास करताना या रस्त्याची माहिती नसल्याने प्रवास करताना या गटारीमध्ये नवीन प्रवाशांचा अपघात झालेला आहे.

या रस्त्यावरून रात्री प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे कारण या गटारीमधुन मोठमोठे साप निघतात व रस्त्यावर वावरत असतात या रस्त्यावरून ४ गावांची वाहतुक मोठ्या प्रमाणात होते शेती मालाची वाहतुक होते बाजारपेठ खिर्डी असल्याने बाजाराच्या दिवशी प्रवास करताना त्रास होतो खिर्डीतील लोक शौचास बसलेले असतात यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते यामुळे शाळेत जाणा-या मुलींना त्रास होतो.

या ४ गावांमधुन दवाखान्यात पेशंट न्यायचा असेल तर या रस्त्यामुळे वेळ वाया जातो या विलंबामुळे कुणाचे प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही लवकर साईड मिळत नाही वाहनांची एकच गर्दी होते अशातच रूग्ण दगावण्याची शक्यता असते. या रस्त्याची रूंदी वाढायला पाहिजे जेणेकरून धोका निर्माण होणार नाही. गटारींचे पाण्याची विल्हेवाट लावुन एक बाजुची गटार कायम बंद करण्यात यावी जेणेकरून रस्ता रूंदीकरण होईल.

जोर्यंत असे होणार नाही तोपर्यंत सदर रस्त्याचे काम सुरू करायचे नाही अशी मागणी ४ गावातील लोकांनी व या गावातील सरपंचानी करणे गरजेचे आहे. या गावातील ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी पसरली असून लवकर मागणी पूर्ण करावी अशी मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!