भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

मांगलवाडी पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना साकडे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील मांगलवाडी गावाच्या प्रलंबित पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत सर्व शक्ती सेनेच्या वतीने राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या सचिवांमार्फत निवेदन देण्यात आले.
तापी नदीकाठावरील मांगलवाडी येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाची नियामक मंडळाची बैठकीत ३५० घरांसाठी ( २५ कोटी रूपये) तरतूद असूनही याची दखल घेतली जात नाही.गेल्या पंधरा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनस्तरावर संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेजवळ पाठपुरावा करूनही दखल घेतली गेलेली नाही.गाव तिन्ही बाजूने बाराही महिने पाण्याने वेढलेले असते.त्यामुळे घरांमध्ये सतत ओलावा असतो.नदीला पुराचे पाणी वाढल्यास,पावसाची झडी लागल्यास गावाची संपूर्ण जमीन अधिक ओलसर राहते. घरांमध्ये सर्दावा ( ओलावा) वाढून भिंतींना मीठासारखे पांढरे द्रव्य ( लोणी) लागते. अनेकांना उंचावर झोपावे लागते.जमीन खोदल्यास जमीनीखाली जवळच ८ ते १० फुटावर पाणी लागेल.पूराचे पाणी जास्त दिवस राहील्यास वा यावेळी भुकंपाने जमीन हलल्यास गाव जमीनीखाली जाण्याचा मोठा धोका आहे.

गावाच्या आजूबाजूला पाणी असल्याने सरपटणारे प्राण्यांपासून अनेकदा धोका निर्माण होतो, पुनर्वसनाच्या यादीत नाव असूनही शासनाकडून गावाला डावलले जात असल्याने गावाचे पुनर्वसनाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.संजय मोरे, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांचेसह मांगलवाडी ग्रामस्थांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे दि.९ रोजी निवेदनाद्वारे केली.आमची मागणी एक महिन्यात पुर्ण न झाल्यास सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असे संजय मोरे यांनी सांगितले. यावेळी किरण निजाई, किरण वैद्य ,लक्ष्मी भोईर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!