आदिवासी संघर्ष समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी विनोद कोळी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। पुनखेडा ता.रावेर येथील रहिवासी युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद रामचंद्र कोळी यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत आदिवासी संघर्ष समिती च्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री डॉ.दशरथ जी भांडे यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री. नितीनभाऊ कांडेलकर, रावेर ता. अध्यक्ष मनोहर कोळी यांनी नियुक्ती पत्र देऊन केली.
कोळी यांनी तालुक्यातील जिल्हातील आदिवासी कोळी बांधव यांच्या न्यायहक्कासाठी लढा देण्याचं तसेच संघटना मजबूत व बळकट बनविण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे संवाद साधताना सांगितले.दरम्यान त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी, सचिव विनोद कोळी, ता. उपाध्यक्ष गफूर कोळी, महिला आघाडी ता.अध्यक्षा सपना सपकाळे, ग्रा.सदस्य राहुल कोळी,प्रदीप भोलाणे, सामाजिक कार्यकर्ते खिर्डी विनायक जहुरे, भिमराव कोचूरे, व सर्व पत्रकार बांधव यांनी त्यांचे अभिनंदन केले .