आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या जळगाव जिल्ह्यात महिला शाखा फलकाचे अनावरण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे, भिमराव कोचुरे। आदिवासी वाल्मिकलव्य सेना महिला शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजितंं करण्यात आला असुन सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आदिवासी वाल्मिकलव्य सेना संस्थापक अध्यक्ष मा शानाभाऊ सोनवणे दौंडाइचा, तसेच महिला प्रदेश अध्यक्षा सौ.कविता ताई कोळी, महिला कार्यअध्यक्षा श्रीमती वैशाली ताई चव्हाण, हे उपस्थित होते,पिंप्राळा शाखेचे उद्घाटन मा शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले, सौ कविता ताई कोळी व वैशाली ताई चव्हाण यांनी द्वीप प्रज्वलन केले,
उदघाटन स्थळी पिप्राला गावातील समाजबांधवानी वाजत गाजत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले,उंदघाटन झाल्यानंतर उपस्थितीत पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.रावेर तालुक्यातील सुदगाव, मांगी, चुनवाडे,थोरगव्हाण,गाते या ५ गावातील आदिवासी वाल्मिकलव्य सेना महिला शाखांचे उद्घाटन करण्यात आले. गाते या गावी शेवटच्या शाखेचे उद्घाटन करण्यात येवून त्याच गावामध्ये सायंकाळी ५ वाजता महिला प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता, या प्रबोधन मेळाव्यात आदिवासी महादेव, मल्हार, टोकरे कोळी व भिल्ल समाजाला जातीचा दाखला मिळवणे व त्याची वैधता प्रमाणपत्र प्राप्त करणेसाठी ज्या प्रकारे प्रशासकीय अधिकारी कडुन या समाजावर अन्याय केला जातो त्या अधिकारांना भारतीय संविधानानुसार आमचा समाज आदिवासी आदिवासी अनुसूचित जमातीचा कसा आहे हे कागदपत्रे पुरव्यासहीत पटवून देण्यात येईल, तरीही अधिकारी अन्याय करुन त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरुपाचे आंदोलनाचे माध्यमातून धडा शिकवला जाईल अशी खात्री समाजाला दिली.त्याचप्रमाणे थोरगव्हाण गावातील भिल्ल समाज वस्तीत जावुन प्रत्यक्ष महिलांची भेट घेऊन त्यांना जातीचा दाखला, घरकुल, शबरी महामंडळाच्या योजना ,खावटी योजना,अल्पबचतच्या योजना, इतर आदिवासी जमातीच्या मिळत असलेल्या योजना तुमच्या पर्यंत शासन पोहचवित आहे किंवा नाही याचा लाभ मिळाला आहे का याबाबत सविस्तर चर्चा शानाभाऊ सोनवणे यांनी केली. व त्या मिळवुन देण्यासाठी आश्वासन दिले..
कार्यक्रम प्रसंगी महिला अध्यक्षा सौ कविता कोळी, कार्य अध्यक्षा श्रीमती वैशाली चव्हाण, सरचिटणीस गुलाबराव बाविस्कर, प्रदेश उपाध्यक्ष खन्ना भाऊ कोळी, बुलढाणा जिल्हा कार्यअध्यक्ष गणेश भाऊ इंगळे,जलगाव जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ बाविस्कर, महिला जिल्हा अध्यक्ष सौ सरिता ताई तायडे, जिल्हा उपाध्यक्ष आशाताई कोळी,सल्लागार चित्तामण जैतकर, यांनी समाजबांधवाना मार्गदर्शन केले…
सदर कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील सर्व तोलामोलाची पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते, याप्रसंगी उपस्थित प्रदेश संघटक आत्माराम दोडे, जिल्हा सचिव दौलत भाऊ कोळी, उपकार्यअध्यक्ष अँड रमाकांत सोनवणे, अशोक बाविस्कर, शहर अध्यक्ष रोहिदास ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष जीवन भाऊ तायडे, जिल्हा सदस्य डॉ पंडित बाविस्कर, कैलास आप्पा कोळी, चोपडा तालुका प्रमुख सुनिल सपकाळे, भुसावळ तालुका प्रमुख राजेश सोनवणे, मुक्ताईनगर महिला अध्यक्षा संगीता ताई तायडे, संपर्क प्रमुख दिलीप भाऊ कोळी, खान्देश प्रसिद्ध प्रमुख विनोद भाऊ कोळी,, अनिल भाऊ कोळी, रविद्र आप्पा कोळी,गोकुळ भाऊ कोळी, शाखा प्रमुख डॉ बिऱ्हाडे, उपशाखा प्रमुख शिवाजी कोळी,सुदगाव शाखा प्रमुख पुजा सपकाळे, उपशाखा प्रमुख लताताई तायडे, सरला सपकाळे, मांगी शाखा प्रमुख वैशाली कोळी,उपशाखा प्रमुख दिपाली कोळी,सचिव प्रतिभा कोळी,चुनवाडे शाखा प्रमुख भाग्यश्री सपकाळे, उपशाखा प्रमुख आरती कोळी,सचिव सुंनदा महाले, गाते शाखा प्रमुख सुमनबाई तायडे, उपशाखा प्रमुख मंगलाबाई कोळी,सचिव ज्योती झाल्टे ,थोरगव्हाण शाखाप्रमुख सराबाई भिल्ल उपशाखा प्रमुख सचिव आदी महिला उपस्थित असुन जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.