भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

शासनाने घरकूल योजनेसाठी घातलेल्या जाचक अटी रद्द कराव्या ग्रामस्थांची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। केंद्र सरकार पुरस्कृत प्रधान मंत्री आवास व रमाई घरकुल योजना ही गोरगरिबांना घरे देण्यासाठी आहे की, घरापासून वंचित ठेवण्यासाठी आहे? असा प्रश्न सध्या सगळीकडे उपस्थित होत आहे.

घरकुल योजनेत सहभागी होण्याऱ्या लाभार्थ्यांसाठी शासनाने जो सर्व्हे चालू केला आहे या सर्व्हेमध्ये जारी केलेल्या जाचक अटी पाहता घरकुल योजना फक्त कागदांवरच अडकून पडणार आहे की काय असे वाटत आहे.

काय आहेत शासनाच्या जाचक अटी
१)लाभ घेत असलेल्या व्यक्तीकडे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन असेल तर लाभ मिळणार नाही
२)मासेमारीची बोट असेल घरकुल मिळणार नाही
३)महिन्याची कमाई 10 हजार असेल तरीसुद्धा लाभार्थी अपात्र
४)घरात फ्रीज किंवा दूरध्वनी जरी असेल तरीही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ज्या गरजू व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घरच नाही किंवा जे मुळातच बेघर आहे अशा व्यक्तीला घरकुलाचा लाभ मिळालाच पाहिजे. परंतु असे न होता ग्रामीण भागांत तोंड बघून ज्या लोकांकडे घर आहे, ज्यांना मुळातच आवश्यकता नाही त्या नागरीकांना घराचा लाभ मिळत असल्याचे दिसून येत आहे. जे खरे व गरजू लाभार्थी आहेत ते मात्र या योजनेपासून वंचित राहताना दिसत आहेत. एकीकडे गरजूंना लाभापासून वंचित ठेवणे आणि दुसरीकडे जाचक अटी लावून ठेवणे यांमुळे एकंदरीत ही योजना नेमकी कोणासाठी?असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.शासनाने घातलेल्या अटीमुळे जे खरे लाभार्थी आहे त्यांच्यावर हा अन्याय होत आहे.तसेच शासनाने घालेल्या अटी त्वरित रद्द करून गोर गरिबांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!