विनोद कोळी यांचा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम,समाजाला दिला आदर्श…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील पूनखेडा गावचे रहिवाशी विनोद रामचंद्र कोळी यांना २८-१०-२०२१ गुरुवार रोजी द्वितीय कन्यारत्न प्राप्त झाले असून त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात वेगळा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले, तसेच त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी २-११-२०२१ मंगळवार रोजी संध्याकाळी त्यांनी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून स्त्रीभ्रूण हत्येवर समाज प्रबोधन केले.कुटुंबात कन्यारत्न झाले आहे, असे आनंदाने तेथील गावकरी सांगत होते. गर्भातच मुलीची हत्या करू नये,असे आवाहन विनोद कोळी यांनी यावेळी नागरिकांना केलेले आहे.त्यांनी सांगितले की, समाजात स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. त्यांना रोखण्यासाठी हे छोटेसे पाऊल आहे. मुलगी झाल्यानंतर तिची हत्या न करता स्वागत करायला हवे. राखी बांधणाऱ्या हाताला गर्भातच मारून टाकू नका, जन्मानंतर तिचे स्वागत करावे,असे म्हणाले.
समाजात नागरिक मुलगी झाली की नाक मुरडतात. मुलीला जन्म देतात, परंतू त्यानंतर मात्र तिच्या आईला मुलगा का होत नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो. मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो, असे समजले जाते. काही कुकर्मी लोक गर्भातच मुलीला ठार मारतात. राज्य शासनातर्फे मुलींसाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात.मात्र त्या अनेकदा फोल ठरत असल्याचे समोर आले आहे. विनोद कोळी यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत केलेला उपक्रम हा कौतुकस्पद आहे.