भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रावेर येथील नामवंत डॉक्टर रात्री- बेरात्री येणाऱ्या रुग्णांकडून घेतात अवाजवी तपासणी फी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कोरोना काळात आपण सर्वांनी डॉ.यांना आरोग्य सेवक ,आरोग्य दुत, देवाची उपमा ही सर्व डॉक्टर , परिचारीका, व ज्यांनी त्यात मोलाची भुमिका व अनमोल सहकार्य केले रुग्णाची सेवा केली जिवाची पर्वा न करता हॉस्पीटल यात सेवा दिली यात कोणीही त्यांचे जीवन भर उपकार विसरणार नाही पंरतु सध्या रावेर तालुक्यातील रावेर शहरात नामाकिंत डॉक्टर यात एम डी , सर्जन स्त्री ,रोगतज्ञ , हदयरोग तज्ञ ,अस्थी रोग तज्ञ यांचे नवीन सावदा रोड भागात भव्य हॉस्पीटल बांधले गेले त्यामुळे रावेर तालुक्यात जळगाव येथे बऱ्याच रूग्णांना तब्बेत दाखविण्यासाठी कामे बरीच कमी झाली बरेच रुग्णांना प्राण ही वाचत आहेत त्यांच्या मुळे यामुळे नवीन संजीवनी मिळत आहे तालुक्यासाठी एक प्रकारे उत्तमच झाले यात शंका नाही तालुक्यात त्यामुळे जळगाव , भुसावळ न जाता बरेच रुग्णांना उत्तम फायदा यात झाला पंरतु जळगाव भागात ज्या प्रकारे काही डॉक्टर हे संधीचा फायदा घेत रुग्णालयात एक रुण सेवा न करता उद्योगधंदे म्हणून गैरवापर करीत असा आरोप नेहमी होत असतो त्याच प्रकारे रावेर येथे पण हाच पायंडा काही नामवंत डॉक्टर व हॉस्पीटले रात्री अपरात्री येणाऱ्या रूग्णाच्या नातेवाईकानां वाईट अनुभव येत आहेत.

ज्या पेशंट(रुग्ण ) त्यांच्याच रूग्णालयात तपासणीस येत असतात अश्या रुग्णास रात्री अचानकपणे तब्बेत खराब झाल्यास आधी तर हॉस्पीटलचा स्टॉप डॉक्टर नसल्याचे सांगतात ज्यामुळे रुग्णाच्या नातेवाईंक हे जास्त आग्रह केल्यास विनवणी केल्यास बघतो डॉक्टर यांना फोन लावुन नंतर डॉक्टर यांची रात्रीची अर्जंट फी १००० रुपये तपासणी लागेल तुम्हाला चालेल तर रुग्णाची तपासणी करतो एक प्रकारे रुग्णाच्या नातेवाईक यांना वेठीस धरण्याचा प्रकार काही नामांकित डॉक्टर रावेर शहरात करतांना दिसत आहे नातेवाईक यांना नाईलाजाने अर्जंट तपासणी फी १ हजार रुपये मान्य करावे लागतात दुसऱ्या तपासणीसाठी खर्च वेगळाच लागतो औषधी खर्च वेगळा एक प्रकारे कोरोनामध्ये ज्या प्रकारे गैर फायदा काही डॉक्टरांनी घेतला तोच आताही तेच पद्धत ही रावेर शहरात सुरु असल्याचे दिसत आहे रावेर शहरात नामकित डॉक्टर यांच्या बोर्डावर लावलेल्या फलक बोर्ड वेगळीच दिसते पहील्यादा तपासणीसाठी ३०० रुपये फेर तपासणी २०० रु व अर्जंट तपासणी ५०० जी बोर्ड वर लावलेली दिसते पंरतु असा डॉक्टर यांचे मनमानी कारभारास गरीब,सामान्य रुग्ण यांना वेठीस धरले जात आहे या उलट श्रीमंत व्यक्ती ह्याचे ओळख मुळेच त्यांचे कामे सुलभ होतेच यात शंका नाही अश्या प्रकारे डॉक्टर हे गुर्मीत व मनमानीपणे सेवा देत आहे कोणी रुग्णाचा नातेवाईक यांने विरोध केल्यास त्यांना सरळ बाहेर जाण्याचा रस्ता दाखविला जातो किंवा तुमच्या रुग्णास जळगाव घेवुन जा असे सांगण्यात येत .ज्यामुळे तो अश्या अन्यायास निमुटपणे सहन करून शांततेने गप्प बसावे लागते ह्याचा फायदा बहुतेक डॉक्टर उचलत आहेत यावर कोणीही आवाज उठवत नसल्याची खंत प्रत्येक नातेवाईक व सुज्ञ नागरिक यांना वाटत आहे. अश्या डॉक्टर महोदयावर कोणतेही कारवाई होत नाही रावेर तालुका डॉक्टर संघटनेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत जेणे करून कोणावरही अन्याय होवु नये अश्या घटनांमुळे डॉक्टर यांची प्रतिमा मलीन होत आहे व सामान्य रुग्णाच्या नातेवाईकात एकप्रकारे रोष निर्माण होत आहे.

डॉक्टर. हया दैवत मानले जाते बऱ्याच डॉक्टर. यांनी आपले जिवाची पर्वा न करता रुग्ण सेवा हीच ईश्वर ही वृत्ती ठेवीत कार्य केले* आहेत काहींनी तर अभी नही तो कभी नही हेच धोरण अवलंबत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!