भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी येथे वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार कधी? स्थानिक प्रशासन लक्ष देईल का

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी गावात मंगळवारचा आठवडे बाजार मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी व शेतकरी यांनी आपली दुकाने लावली असून सतत होणारी वाहतूक खोळंबत असते.अगदी रस्त्यावर बसून फळे,भाजीपाला,खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक वस्तू व खेळणी विक्रेते यांनी आपली दुकाने थाटल्याने तसेच बाजारात ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे दुचाकी, तीनचाकी,चारचाकी,तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असून या ठिकाणी एखाद्या वेळेस टायर फुटल्यास अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न नेहमी उपस्थित होत असतो.तसेच कुणाला वाहनाचा धक्का लागल्यास वादविवाद होत असतात.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनानेही आठवडी बाजारामुळे सततची होणारी वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारकांना या बाजारातून वाहन चालवितांना नाहक त्रास सहन करावा लागतो.तसेच बऱ्याचदा बाजाराच्या दिवशी या रस्त्यावर समोरून अवजड वाहने आली असता एकमेकांना साईड देण्यासाठी जागा नसल्याने त्यांना आपली वाहने रिव्हर्स मध्ये घेतांना तारेवरची कसरत करावी लागते.बाजारकरी यांच्या गर्दीमुळे वाहतूक खोळंबून वाहने अडकलीत परंतु स्थानिक प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नाही?का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडत आहे.ही समस्या दर मंगळवार बाजाराचे दिवशी ही समस्या भेडसावत असून वाहन धारकांना मात्र या रस्त्यावरील गर्दीतून वाहन चालविणे जिकरीचे ठरत आहे.या सर्व बाबीची स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून योग्य ती उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!