खिर्डी परिसरातील अवैध वृक्ष तोड बंद होणार ? वृक्ष प्रेमींचा संतप्त सवाल.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करीत असते त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च देखील होत असतो. मात्र असे असले तरी वाढ पूर्ण झालेल्या वृक्षांचे संगोपन होतांना कोठेही दिसत नाही. वृक्ष आणि मानवाचे नाते प्राचीन काळापासून अतिशय घट्ट आहे.परंतु वृक्षांचे संरक्षण होण्याऐवजी निंब,बाभूळ,चिंच,या वृक्षांची वृक्षतोड होतांना मोठ्या प्रमाणात सध्या दिसून येत आहे.खिर्डी परिसरात दिन दहाडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून खिर्डी परिसरात ही अवैध वृक्षतोड कोणाच्या आशीर्वादाने होत आहे.वनविभाग जाणूनबुजून तर दुर्लक्ष करीत नाही ना ? यात कोणाकोणाचे हात ओले होत आहेत. हे पाहणे गरजेचे आहे.