भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु येथे ‘स्वच्छ भारत मिशन’चा फज्जा,लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,भिमराव कोचुरे । स्वच्छ भारत अभियानातंर्गत प्रत्येक गाव आणि घराघरात शौचालयाची उभारणी करण्यात यावी या हेतूने शासनाने हे अभियान सुरू केले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाची केवळ कागदोपत्रीच अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जि.प.जळगाव यांचे मार्फत लावण्यात आलेले फलक हे लोकांच्या दृष्टीस येवू नये म्हणून जि प शाळेच्या आवारात लावले असून या बाबत गावात अनेकवेळा चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

खिर्डी खु येथे सार्वजनिक शौचालयाचीही दुरावस्था झाल्याने या गावातील महिलांना व पुरुषांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. खिर्डी गावाची लोकसंख्या 5 ते 6 हजारापर्यंत आहे.मात्र असे असूनही या गावात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असून नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.तसेच गावातील बहुतांश नागरीकांकडे खासगी जागा नसल्याने त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून रहीवास सुरू केला आहे.यामूळे अशा नागरीकांना घरकुल व वैयक्तीक शौचालयाचा लाभ मिळणे दुरापस्त झाले आहे.यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालय उभारले आहे.मात्र या सार्वजनिक शौचालयाची निर्मिती झाल्या पासून ते आज पर्यंत ग्रामपंचायतीचे देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.पाण्या अभावी वापर होत नसून परीणामी महिलांना व पुरुषांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचा प्रकार निंदनीय असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतीच्या देखभाली अभावी सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.तसेच शौचालय व परीसरात अस्वच्छतेचा वेढा पडल्याने महीला शौचालयाचा वापर करण्यास धजावत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामूळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाला खिर्डी खु येथे तिलांजली देण्यासारखा प्रकार दिसून येत असल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यागावात जागेअभावी बहुतांश नागरीकांकडे वैयक्तीक शौचालय नसल्याने अनेक पुरूष व महीलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे लोक प्रतिनिधी लक्ष देतील का?
तूर्त एवढेच

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!