भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

पातोंडी येथे अवैध दारू विक्री बंदीसाठी महिलांचा एल्गार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पातोंडी येथे दारूबंदी साठी गावातील सर्व महिलांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच यांची भेट घेऊन गावातील दारू बंद करण्यासाठी रावेर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.

या निवेदनात असे म्हटले आहे की गावातील काही लोक नेहमी दारूविक्री करत असतात त्यामुळे गावातील पुरुष मंडळ हे कुटुंबातील महिलांना शिवीगाळ मारहाण करून त्रास देत असतात त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होत असतात आणि त्यामुळे ते टाळण्यासाठी पातोंडी परिसर बहुउद्देशीय महिला मंडळ यांच्या अर्जानुसार गावातील दारू विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून गावातील दारूविक्री बंद करावी आणि दारू विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुउद्देशीय महिला मंडळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देतेवेळी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा योगेश ठाकणे सचिव छायाबाई सुनील सोनवणे सदस्या देवकाबाई सपकाळे रेखा रविंद्र ठाकणे जनाबाई ठाकणे सुनंदाबाई अशोक ठाकणे यांसह गावातील महिला उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!