निंभोरा येथील युवा कार्यकर्त्यांनी केला गोमातेचा अंत्यविधी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर ,प्रतिनिधी। तालुक्यातील निंभोरा येथील युवकांनी एका मृत्यूमुखी पडलेल्या गाईचा अंत्यविधी केला. प्राप्त माहिती नुसार असे समजतेकी ही गाय काही दिवसापासून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारू लागली होती.या गाईची चौकशी केली असता या गाईला कुत्र्याने चावा घेतल्यामुळे ऐन हिवाळ्याच्या दिवसात वेदनांनी त्रस्त होऊन अखेर ५ डिसेंबर रोजी सकाळी ४/५वाजेच्या सुमारास लोकांना ती गाय रस्त्यात मरण पावलेली दिसली ही बातमी युवकांना समजताच त्यानी पुढे येऊन अंत्यविधीचा सामान घेऊन वाजंत्री ने बैलगाडी मध्ये मिरवणूक काढून गाईची विधिवत अंत्ययात्रा काढली व तीला मुख माती दिली.
यावेळी अंत्ययात्रेत युवा कार्यकर्ते नितीन पाटील, स्वप्नील चौधरी, परमानंद शेलोडे, चंदु चौधरी, पिंटू चौधरी, धीरज भंगाळे, प्रदीप चौधरी, गोलू भंगाळे, मिलिंद भंगाळे, ईश्वर पाटील, योगेश पाटील, माळी डॉन रिक्षा वाले, राजकुमार महाजन, रिक्षा वाले गौरव सोनवणे, अक्षय नेहते रामकृष्ण धनके लोकमत पत्रकार दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते. तसेच यावेळी सरपंच सचिन महाले यांनी अंत्यविधी साठी खड्डा खोदकामाकरीता आपले जेसीबी यंत्र पाठवले होते सदर युवकांनी केलेल्या कामाचे गावासह पंचक्रोशीत कौतुक होत आहे…