खिरोदा येथे “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर महाव्याख्यानाचे आयोजन
खिरोदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। साने गुरुजी विद्याप्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा येथे प्राचार्य डॉ.एस.टी.भूकन सर यांचे व्याख्यान झाले.यात डॉ. भूकन सर यांनी, मानवाचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो ,प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या अंतरंगाची ओळख केली पाहिजे, कारण आत्म प्रतिमा ही यशाची गुरुकिल्ली आहे ,यामुळे मानवी दृष्टीकोन सकारात्मक पद्धतीने कार्य करतो याचप्रमाणे ध्येयवादी आयुष्य जगले पाहिजे तरच मानवाचा खऱ्या अर्थाने विकास होईल, असे मत व्यक्त केले.
तसेच विद्यापीठांच्या परीक्षा यांवर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व परीक्षा मूल्यमापन पद्धती यावर छात्राद्यापकांना मार्गदर्शन केले. .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. एन.एन.लांडगे सर यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमास प्रा. डॉ. बी. जे. मुंडे,प्रा. डॉ.एस.आर. रतकल्ले, लायब्रीयन प्रा सोनवणे तसेच सर्व छात्राद्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राद्यापक संतोष पाटील यांनी तर आभार प्रा. डॉ. पी. डी. सूर्यवंशी मॅम यांनी केले