खिरोदा येथे क्रीडास्पर्धा व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिरोदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। साने गुरुजी विद्याप्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा येथे क्रीडास्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन याचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.टी.भूकण सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डि.एन.विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. जी.बोरोले सर होते मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. सोबत प्रथम वर्ष ब.एड छात्राद्यापकांचे स्वागत करण्यात आले,. छत्राद्यापक सर्वांगीण क्षेत्रात विकसित व्हावें-भूकन सर सर.सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये एकलगीत,भावगीत, गणेशवंदना, समूह गीत गायन,स्त्री भ्रूण हत्यावर नाटक, देशभक्ती गीत, मातृभाषा गीत,,भारुड, आदिवासी नृत्य, गरबा, भारतीय वेशभूषा त्यात महाराष्ट्र, आसाम, दक्षिण भारत,पंजाबी, आदिवासी अश्या वेशभूषा करण्यात आल्या. तसेच शेलपागोटे घेण्यात आला, कार्यक्रम याचे सूत्रसंचालन व आभार संतोष पाटील व दीपाली तायडे यांनी केले. कार्यक्रमास सर्व प्राधापक,शिक्षकेतर कर्मचारी, तसेस सर्व विद्यार्थी उपस्तीत होते,कार्यक्रमासाठी सागर गायकवाड, प्रशांत तायडे, नवल पाटील, हरीश पाटील. तसेच सर्व छत्रध्यापकांनि मेहनत घेतली.