भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

पळवून नेत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार,अश्लील फोटो व व्हिडिओ काढत व्हायरल करण्याची धमकी

जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत तिच्यावर जळगाव तालुक्यातील शिरसोली जंगलात तसेच इंदोर शहरातील प्रीतमपुरा भागात बलात्कार करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देवून तरुणीसह तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची ही धमकी दिली. ही घटना जळगाव तालुक्यात घडली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला
त्या नराधमासह तरुणीला पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या तिघा मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, १७ वर्षीय तरुणी तिच्या परिवारासह जळगाव तालुक्यात राहते. दरम्यान मकर संक्रांतीच्या दिवशी दि.१४ ते २० जानेवारी दरम्यान संशयित आरोपी नितेश धनराज राठोड (रा. धानवड ता. जळगाव) याने तिच्याशी मैत्री करून नंतर तिचे मनाविरुद्ध जबरदस्तीने पळवून नेत तिच्यावर जळगाव तालुक्यातील शिरसोली जंगलात तसेच इंदोर शहरातील प्रीतमपुरा भागात बलात्कार करून  तिचा एकटीचा तसेच त्याचेसह अश्लील फोटो व व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. यासोबत तरुणीच्या आई-वडिलांना व तिला मारून टाकण्याची धमकी देत पळून नेऊन तरुणीच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध केले. या प्रकाराला नितेश राठोड चे मित्र गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भाऊलाल चव्हाण, गोरख थानसिंग चव्हाण (सर्व रा. धानवड ता. जळगाव) यांनी मदत केली.

या घटनेने जळगाव तालुक्यात खळबळ उडाली असून
नितेश धनराज राठोड (रा. धानवड ता. जळगाव. या नराधमा सह त्याला या प्रकरणात मदत करणारे गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भाऊलाल चव्हाण, गोरख थानसिंग चव्हाण (सर्व रा. धानवड ता. जळगाव) यांचेवर जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!