भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १९ मे रोजी बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात घडली.

याबाबत अधिक वृत्त असे की, जळगाव शहरात कुटुंबासह रहात असलेल्या १४ वर्षीय मुलगी १९ मे सोमवार रोजी जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. सदरचा प्रकार तिच्या कुटुंबातील लोकांच्या लक्षात आलेवर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पंरतू ती मिळून आली नाही. अखेर या बाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!