शेठ ला.ना.सा.विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धेने किशोर महोत्सव – २०२४ चा उत्साहात शुभारंभ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा. विद्यालयात विद्यार्थ्याच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या हेतूने शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेने किशोर महोत्सव -२४ चा श्रीगणेशा शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री.संजय भारुळे, पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप, श्री.संजय वानखेडे, सौ.सविता दातार,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.रेवती किन्हीकर, उपप्रमुख संपदा छापेकर यांचे उपस्थितीत फीत कापून करण्यात आला.
या वेळेस सकाळ विभागातील २०० तर दुपार विभागात २७० असे एकूण ४७० अशा भरघोस संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, सकाळ विभागात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा प्रमुख सौं.योगिता गवलकर मॅडम, श्री. बापू पाटील सर, श्री.हितेंद्र जोशी सर, सौं. रुपाली महाजन मॅडम यांनी स्पर्धा घेतली, तर दुपार विभागात आदरणीय मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर, जेष्ठ पर्यवेक्षक श्री. प्रशांत जगताप सर, जेष्ठ शिक्षिका सौं. सविता दातार मॅडम तसेच सांस्कृतीक विभाग प्रमुख सौं.रेवती किन्हीकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली समिती मध्ये असलेल्या सदस्य जेष्ठ शिक्षिका सौं.संगीता कुलकर्णी मॅडम, सौं. स्मिता करे मॅडम,, सौं. सुवर्णा वंजारी मॅडम,श्री.नितीन कोष्टी सर,श्री. पंकज खंडाळे सर या सर्वांच्या सहकार्याने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा नियोजनबद्धपणे पार पडली.
किशोर महोत्सव-२४ अंतर्गत कथाकथन, वक्तृत्व, निबंध, हस्तकला, हस्तलिखित, विविध गुणदर्शन , किल्ला बनविणे, गणित अध्यापन साहित्य निर्मिती, विज्ञान रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांनी केले आहे.