२१ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला, तरुण गंभीर जखमी, तिघांना जळगाव येथून अटक
यावल तालुक्यातील घटना
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील आडगाव जवळ दुचाकीचा धक्का लागल्याने वाद होऊन २१ वर्षीय तरुणावर तिघांनी चाकू ने वार केले. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवार ३१ ऑगस्ट रोजी घडली.या बाबत यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी जळगाव एम आय डी सी परिसरातून अटक केली आहे.
प्रशांत किशोर धनगर.वय २१ वर्ष. रा. चहार्डी, ता.चोपडा हा तरुण यावल तालुक्यातील आडगाव जवळील सातपुडा निवासी श्री क्षेत्र मनुदेवी येथे दर्शन साठी आला असता परत जात असताना रस्त्यावरील शनिदेव मंदिर जवळील फॉरेस्ट गार्डन समोर एम एच १९ डी यू ६९१३ या दुचाकीचा धक्का लागला.त्या वेळी त्या दुचाकी वरील तीन तरुणांशी त्याचा वाद झाला. वाद विकोपाला पोहोचत शिवीगाळ करून तिघांनी त्याला मारहाण करून एकाने प्रशांत धनगर याच्या पोटात चाकूने वार केला.त्यात तो गंभीर जखमी झाला.
या बाबत यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन चेतन संभाजी सोनवणे.खुशाल शत्रुधन कोळी,व सूरज नाना पाटील या तिघा आरोपींना मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव एम आय डी सी परिसरातील एका घरातून अटक केली.