क्राईममहाराष्ट्र

किरकोळ वादातुन प्रियकराकडून चाकूने वार : प्रियसीचा मृत्यू !

Monday To Monday NewsNetwork|

पुणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा : किरकोळ वादातुन प्रियकराने नवीन कात्रज बोगदा येथे तरुणीवर चाकूने वार केले. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री 10 वाजता घडली आहे. प्रेयसिच्या हत्या प्रकरणी प्रियकरास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सपना दिलीप पाटील (वय 32, रा. पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, कात्रज) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून रामकिसन गिरी (वय 36, रा. परभणी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना कात्रज जवळील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. तर आरोपी रामकिसन हा हॉटेलमध्ये कामाला होता. मागील 5 ते 6 वर्षापासून त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, रविवारी रामकिसनने कार भाडयाने करुन सपनाला जेवण करण्यासाठी बाहेर घेवून गेला. त्यानंतर त्याने कार चालकास नवले पूलापासून कात्रज नवीन बोगद्याकडे गाडी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर रामकिसनने त्याच्याकडील चाकूने सपनावर वार केले, त्यानंतर रामकिसन घटनास्थळावरुन फरार झाला होता.  

दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सपनाला कार चालकाने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथून तिला उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाताच भारती विद्यापीठ पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी रामकिसन यास अटक केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!