भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

मुक्ताईनगर मतदारसंघातील नागरिक सुज्ञ,विकास कामे करतो हे जाणून– रोहिणी खडसे

वाघोदा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज : राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पंधराव्या दिवशी रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील सिंगनुर, दसनुर, आंदलवाडी ,लहान वाघोदा येथे ग्रामस्थां समवेत संवाद साधला

यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्याकडे, “रडत रडत मला राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार जाहीर करा “अशी विनवणी करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील यांना आता राष्ट्रवादीवर बोलण्याचा अधिकार नाही. गेल्या 30 वर्षापासून मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादीला 70 ते 75 हजार मतदान मिळत आलेले आहे. बोदवड तालुका हा मिनी बारामती म्हणून ओळखला जातो तो सदैव माननीय शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. त्यावेळच्या राजकीय परिस्थिती नुसार आ. चंद्रकांत पाटील यांना 2014 मध्ये राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा दिलेला होता. फक्त तरुण उमेदवार आणि नवीन चेहरा म्हणून त्यांच्या पारड्यात राष्ट्रवादीने मतदान केले होते. ते स्वतः म्हणतात की,फक्त पाच सात -हजार मते राष्ट्रवादीकडे होती,तर शरद पवार आणि अजित पवारांनी यांच्याकडे ते रडत रडत येऊन पाठिंबा का मागत होते? केवळ पाच -सात हजार मते असताना त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत करा ही काकूळतीची विनंती करण्याची गरज काय होती?असा सवाल करून कडवट शिवसैनिक म्हणवणारे आमदार पाटील यांनी यापुढे एकनाथ शिंदे तरी एकनिष्ठ राहावे असे सांगत त्यांनी आमदारांवर टीका केली.

दिला. त्यांच्या निवडणूक प्रचारात आणि रॅलींमध्ये फक्त राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचाच भरणा होता हे त्यांनी त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप पाहून खात्री करून घ्यावी.जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पक्षादेशानुसार त्यांच्यासाठी उमेदवारी माघारी घेऊन फार मोठा त्याग केला आहे, मात्र या त्यागाची जाणीव त्यांनी ठेवली नाही. अशी घणाघाती टीका युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी केली. संवाद यात्रेला सर्वच गावातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. रोहिणीताई ग्रामस्थ-महिला-युवकांशी संवाद साधून समस्या जाणून घेत आहेत. गेल्या निवडणुकीत पराभव होऊनही जनसेवेची आस असलेल्या रोहिणी खडसे कार्यकुशल नाथाभाऊंचाच कित्ता गिरवता असल्याने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शरद पवार व नाथाभाऊंचे हात मजबूत करावे, असे आवाहन रवींद्र नाना पाटील यांनी केले. रोहिणी खडसे सक्षम युवा नेतृत्व या मतदार संघाचा भविष्यात कायापालट करतील असे पाटील यांनी सांगितले.

गेले तिस वर्ष एकनाथराव खडसे यांनी आपल्या परिसरात भाजप घरोघरी पोहचवली परंतु पक्षातील काही लोकांकडून अशी परिस्थिती निर्माण केली गेली की आम्हाला भाजप सोडावे लागले परंतु शरद पवार साहेबांनी एकनाथराव खडसेना विधानपरिषदेत पोहचवून त्यांचा सन्मान केला खडसे यांनी या परिसरात अनेक विकास कामे केली जे विकास कामे राहिले असतील ते पण एकनाथराव खडसे यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील दसनुर येथील सुकी नदीवरील पुल एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा करून मंजुर केला काही तांत्रिक अडचणी मुळे त्याला उशिरा निधी प्राप्त झाला त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत परंतु आपण सुज्ञ आहात आपण विकास कामे करण्यासाठी कोण सक्षम आहे हे आपण जाणतात तुम्ही सर्व आतापर्यंत एकनाथराव खडसे पाठीमागे उभे राहिले तसेच भविष्यकाळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले

जनसंवाद यात्रेत यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जि प सदस्य कैलास सरोदे, प स सदस्य दिपक पाटील, किशोर गायकवाड ,योगिता वानखेडे, सुनिल कोंडे, युवक अध्यक्ष सचिन पाटील, मेहमूद शेख, वाय डी पाटील, कुणाल महाले, गौरव वानखेडे, अमोल महाजन, सचिन महाले, शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, योगेश्वर कोळी, सिद्धार्थ तायडे, किशोर पाटील, रुपेश पाटील, कमलाकर पाटील, रवींद्र पाटील, नितीन पाटील, पवन चौधरी, राजेश पाटील, शुभम मुर्हेकर, जिवन बोरनारे, नितीन पाटील, केतन पाटील, वासुदेव चौधरी, सुशिल तायडे, ललित कोळंबे, चंद्रकांत पाटील, सतिष पाटील, प्रदिप साळुंखे, नंदकिशोर हिरोळे, बाळाभाऊ भालशंकर, चेतन राजपुत, वसंता पाटील, विशाल रोठे, भुषण धनगर, रोहन च-हाटे, नवाज पिंजारी, भूषण कोळी, रवी खेवलकर, नईम खान, डॉ पठाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!