उमेदवाराचं स्वत:लाच मतदान नाही, ग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
कोल्हापूर (वृत्तसेवा): राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ अखेर आज संपली. असून 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. नुकतंच ग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पेरीडमध्ये एकाही मतदाराने मतदान केलं नाही. विशेष म्हणजे उमेदवारानेही स्वत:ला मतदान केलेलं नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील पेरीड ग्रामपंचायत निवडणुकीत आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. या गावात उमेदवारासह एकाही व्यक्तीने मतदान केलेलं नाही. या गावातील 9 पैकी 8 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर एका वॉर्डात 2 उमेदवार रिंगणात होते. मात्र या दोन्ही उमेदवारांनी एकालाही मतदान केलेलं नाही. विशेष म्हणजे स्वतः उमेदवाराने स्वतःला मतदान केलं नाही.
शाहूवाडी तालुक्यातील पेरीड गाव आहे. या गावात कधीच निवडणूक झाली नव्हती. या गावात बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या ठिकाणी 9 सदस्यांची ग्रामपंचायत असून 8 सदस्य बिनविरोध ठरले आहेत. मात्र एका उमेदवारावर एकमत न झाल्याने केवळ एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात उतरले होते. पण उमेदवारासह एकाही व्यक्तीने मतदान केलेलं नाही.