कोटेचा महिला महाविद्यालयाची बारावीची यशाची परंपरा कायम….
कुंभारखेडा,ता रावेर.मंडे टु मंडे न्युज. प्रा.योगेश कोष्टी | भुसावळ येथील श्रीमती प क कोटेचा महिला महाविद्यालयाची इयत्ता बारावीचे यशाची परंपरा कायम राखण्यात महाविद्यालयाने यश मिळवले आहे. सन 2024 – 25 या शैक्षणिक वर्षात नाशिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून विज्ञान शाखेतून पाटील अनुष्का स्वप्निल 78.50 प्रथम , पाटील वैष्णवी बाबुराव 76.50 द्वितीय आणि अहिरराव धनश्री संजय 74.33 तृतीय आली आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल 92,% लागला असून वाणिज्य शाखेतून साळी गुंजन दीपक प्रथम 92%, भांगडीया दिया रुपेश 76% द्वितीय चौधरी हेमांगी प्रमोद 61% तृतीय आलेली आहे.
कला शाखेचा निकाल 60 टक्के लागला असून प्रथम जास्मिन राजू तडवी 70% द्वितीय लोहार हर्षदा संतोष 67% तृतीय तडवी मुस्कान याकुब 63% मिळवत या संपादन केले आहे. यशस्वीतांचे संस्थेचे अध्यक्ष , सचिव, सर्व सदस्य तसेच उपप्राचार्य डॉ. शरद अग्रवाल तसेच महाविद्यालयीन स्टाफ तर्फे खूप खूप अभिनंदन करण्यात आलेले आहे.